मविआच्या रणरागिणींनी स्ट्राँगरूमसमोर तळ ठोकला; थंडीची पर्वा न करता उरणमध्ये महिलांचा डोळ्यांत तेल घालून पहारा

नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीला आठवडा उलटला असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उरण नगर परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार याचाही फैसला त्याचदिवशी लागेल. मतदान झाल्यानंतर इलोक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नगर परिषदेच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवली आहेत. तिथे कोणतीही गडबड होऊ नये म्हणून स्ट्राँगरूमसमोर महाविकास आघाडीच्या रणरागिणींनी तळ ठोकला आहे. थंडीची पर्वा न करता डोळ्यांत तेल घालून तेथे खडा पहारा दिला आहे.

उरणमध्ये २१ नगरसेवक व एका नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर विविध केंद्रांवरील सर्व यंत्रे स्ट्राँगरूममध्ये पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली आहेत. ईव्हीएम मशीनच्या सरक्षेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच विविध राजकीय पर्शाच्या कार्यकत्यांनादेखील पहारा देण्याची परवानगी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीच्या महिलांनी स्ट्राँगरूमच्या समोरच ठिय्या मांडला आहे.

  • मविआच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन महिला कार्यकत्यांची फौज तैनात केली आहे. रोज रात्री साडेनऊ ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत स्ट्राँगरूमवर बाँच ठेवण्यात येतो.
  • मविआचे अन्य पदाधिकारीदेखील स्ट्राँगरूमवरील सीलची पाहणी रोज करत आहेत. उरणमध्ये थंडी असूनही रणरागिणी आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे.

जेवण उघड्यावरचः डासांच्या बंदोबस्तासाठी मच्छरदाणी
मविआच्या महिला पदाधिकारी कितीही थंडी असली तरी रात्री स्ट्राँगरूमचा परिसर सोडून जात नाहीत. जेवण त्याच ठिकाणी उघड्यावर केले जाते. बिछानासुद्धा तेथे टाकण्यात आला असून डासांच्या बंदोबस्तासाठी मच्छरदाणी लावली आहे. कितीही त्रास होऊ द्या आम्ही २१ डिसेंबरपर्यंत पहारा देणारच, असा निर्धार महिलांनी केला आहे.

  • मतमोजणी होईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम मशीन सुरक्षित राहव्यात यासाठीच रात्रीपासून सकाळपर्यंत वॉच ठेवण्यात येत असल्याची माहिती मविआच्या उमेदवार नाहिदा ठाकूर यांनी दिली.