
राज्यातील थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून ओळखल्या जाणाऱया महाबळेश्वरमध्ये राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने निळय़ा भाताच्या शेतीचा अनोखा प्रयोग राबवण्यात येत आहे. मूळ इंडोनेशियातून आणलेल्या निळय़ा भाताची आता महाबळेश्वरमध्ये शेती होत आहे. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, काळा गहू, केशराची शेती आणि आता निळा भात पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी नावीन्यपूर्ण प्रयोग राबवण्यात येतात. काही महिन्यांपूर्वी महाबळेश्वरमध्ये काळय़ा गव्हाची शेती आणि कश्मीरमधील केशराच्या कंदाची लागवड यशस्वी करून दाखवला होती. आता महाबळेश्वरमध्ये निळय़ा भाताच्या शेतीचा प्रयोग राबवण्यात येत आहे महाबळेश्वरमधील बिरमणी गावातील प्रकाश मोरे यांच्या शेतात निळय़ा भाताची लागवड केली आहे. सातारा विभागाचे उपसंचालक विजय राऊत, वाई येथील उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकात गोरड यांच्या हस्ते भाताच्या निळय़ा वाणाची पेरणी करण्यात आली.
निळ्या भातातील पोषक तत्त्वे
निळय़ा भातात प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, झिंकचा समावेश आहे. यामुळे शरीराची झीज भरून निघते. निळय़ा भातात शर्करेचे प्रमाण 0. 58 टक्क्यापेक्षा कमी आहे. बिरमणी येथे निळय़ा भाताची लागवड केल्यानंतर आता बिरवाडी, कासरुंड, भोसे, पांगारी, दानवली गावांतील शेतकरीही या भाताची लागवड करणार आहेत.
मूळ वाण इंडोनेशियातील
या अनोख्या प्रयोगाची अधिक माहिती देताना कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे म्हणाले की, निळय़ा भाताचे वाण हे इंडोनेशियातील असून आसामच्या काही शेतकऱयांनी याच निळय़ा भाताची लागवड केली होती. 2018 मध्ये नगर जिह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱयाने तीन किलो निळय़ा भाताचे बियाणे आणले होते. त्यापासून दोन वर्षांत चौदा किलो बियाणे उत्पादित केले. या वर्षी 50 किलो बियाणे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱयांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सातारा जिह्यात निळय़ा भाताचा प्रयोग प्रथमच होत आहे.
कोकण मार्गावर धावणाऱया दादर-मडगांव जनशताब्दी डेली स्पेशल एक्सप्रेसला गुरुवारपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एलएचबी डबे लावण्यात आले आहेत. याशिवाय पारदर्शक विस्टाडोम डबादेखील जोडला आहे. तसेच या गाडीचा प्रवास सुरू होण्याचे आणि संपण्याचे स्थानकही बदलले आहे. ट्रेनचा प्रवास आता दादरऐवजी सीएसएमटीहून सुरू होणार आहे.



























































