महाबँक कर्मचाऱयांचा संप, सर्व कर्मचारी संघटना होणार सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्त पदे तातडीने भरा या मागणीसाठी महाराष्ट्र बँकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. बँकेतील कर्मचारी उद्या, सोमवारी संपावर जाणार आहेत. रिक्त पदांबरोबरच अन्य मागण्यांबाबत कामगार उपायुक्तांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्याने संपाचा निर्णय घेतल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र बँकेत हंगामी पदावरील कर्मचाऱयांना रिक्त पदांवर सामावून घेण्यात यावे त्याचप्रमाणे मृत्यू, निवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती आणि पदोन्नती आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या लिपिक पदाच्या जागा भरण्यात याव्यात अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, महाबँक नवनिर्माण सेना या संघटना संपात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र बँकेच्या नव्या शाखा उघडल्या जात असल्याने अतिरिक्त कर्मचाऱयांची गरज आहे. नव्या सरकारी योजनांमुळे कामाचा बोझा वाढला आहे. मर्यादित कर्मचारी असल्याने आहेत त्या कर्मचाऱयांना जास्त वेळ काम करावे लागत आहे.

अशा आहेत मागण्या
n शिपाई, स्वच्छता कर्मचाऱयांच्या रिक्त जागा भरा. n पुरेशा प्रमाणात लिपिक भरती करा. n कोरोना काळात केलेल्या लिपिकांच्या बदल्या मागे घ्या. n सर्व शाखा आणि एटीएममधून काढून टाकलेल्या सुरक्षा रक्षकांना पुन्हा नेमा.