महाबळेश्वरमध्ये थंडा थंडा कूल कूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलास काळे । महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर मध्ये थंडीचा जोर वाढला असून आज वेण्णा लेक परिसर मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे परिसरात हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले . नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवर पहावयास मिळाले .गाड्यांचे टप व झोपड्यांचे छप्पर तसेच लिंगमाळा परिसरातील स्मृतीवन परिसर व तेथील रान फुले त्याच्या शेंगावर दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे पांढरे झाल्याचे दिसत होते. दरम्यान थंडीच्या हंगामात या वर्षी हिमकण दिसण्याची हि पहिलीच वेळ असल्याने त्याबद्दल विशेष कुतूहल होते. त्याचा आनंद हि स्थानिकांसह फिरायला आलेल्या पर्यटकांनी घेतला .हवामान खात्याच्या नोंदीनुसार आज या पर्यटन स्थळाचे किमान तपमान १३.५ अंश डिग्री सेल्सियस आहे.दरम्यान वेण्णा तलावते लिंगमाळा परिसरात ते 3 ते 4 अंश डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असण्याची शक्यता जाणकार शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

गेले दोन दिवस येथे गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी होती. दरम्यान रात्री गार वारे कमी झाले मात्र थंडीचा जोर वाढला होता. यामुळे ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीभोवती लोकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते . गेले तीन दिवसांच्या थंडीमुळे शहर व वेण्णा तलाव परिसर चांगलच गारठला होता . सततच्या वाढणाऱ्या थंडीच्या काद्क्यामुके वेण्णा तलाव परिसर चांगलाच गारठला होता ,काही ठिकाणी तो गोठलाही होता .त्यामुळे दव बिंदू गोठून काही भागात हिमकण तयार झाल्याचे फारच सुंदर दृश्य पहावयास मिळत होते .वेण्णा तलावावर नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते .ते गोळा करण्याचा आनंद आज अनेक हौशीनी घेतला असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवर पहावयास मिळाले .गाड्यांचे टप व झोपड्यांचे छप्पर दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे पांढरे झाल्याचे दिसत होते. दरम्यान थंडीच्या हंगामात या वर्षी हिमकण दिसण्याची हि पहिलीच वेळ आहे. दरम्यान आजही थंडीचा जोर येथे कायम आहे.