
महाड-विन्हेरे मार्गावरील कुर्ले घाटात दोन भरधाव एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही बसमधील चालक पंडक्टरसह 10 प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बसचे चालक आणि वाहक तसेच प्रतीक विनोद भोसले (18), प्राची विठ्ठल सपकाळ (17), प्रियंका गोपाळ सपकाळ (13), तारा गंगाराम पवार (53), शीतल दामोदर वाघमारे (40) आणि सुरेखा जनार्दन भोसले (55), सर्व रा. मुमूर्शी, महाड, हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































