
सामना ऑनलाईन । मुंबई
दूध व दूध भुकटी निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शालेय पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी दूध दरांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. दूध उत्पादकांना दर मिळत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. आमदार सुनील प्रभू यांनीही दुधाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. याबाबत शिवसेनेने जोरदार मागणी केली होती.


























































