
राज्यासाठी दहा हजार मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती करणाऱया महानिर्मितीला आता कोरोनाची ’बाधा’ झाल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे राज्यातील उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी कमालीची घाटली आहे. विजेची मागणीच कमी असल्याने स्वस्ताची वीज आधी खरेदी करण्याचे धोरण महावितरणने अवलंबले आहे. त्याचा थेट फटका महानिर्मितीला बसला असून साडे तेरा हजार मेगावॅट एवढी मोठी वीजनिर्मिती क्षमता असतानाही केवळ अडीच-तीन हजार मेगावॅट एवढी कमी वीज निर्मिती सुरू आहे.
उन्हाळ्यात महावितरणकडे 20 हजार मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विजेची मागणी नोंदली जाते. त्यानुसार महानिर्मिती मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यात आठ-नऊ हजार मेगावॅट एवढी वीज निर्मिती करत होती. मात्र आता विजेची मागणी 12-13 हजार मेगावॅट पर्यंत खाली अली आहे. त्यामुळे महावितरणने वीज आयोगाच्या निर्देशानुसार सर्वात स्वस्त वीज आधी घेण्याचे तत्व अवलंबले आहे. सध्या देशातच विजेची मागणी कमी असल्याने केंद्रीय एक्सचेंज मधून सरासरी अडीच रुपये प्रति युनिट दराने वीज मिळत आहे. महावितरण दररोज एक्सचेंज मधून सुमारे दोन हजार मेगावॅट पर्यंत वीज घेत आहे. तसेच एनटीपीसीच्या काही औष्णिक प्रकल्पातील साडे सहा हजार मेगावॅट, अदानी, धारीवल, जिंदाल यांच्याकडून साडे चार हजार मेगावॅट वीज घेत आहे. तर उर्वरित महानिर्मितीच्या खापरखेडा, पारस आणि चंद्रपूर वीज केंद्रातून अडीच हजार तर उरण गॅस आणि कोयना वीज प्रकल्पातून गरजेनुसार वीज घेतली जात आहे.
एनटीपीसीच्या दोन प्रकल्पनां फटका
महानिर्मितीबरोबरच एनटीपीसीचे दोन प्रकल्प बंद आहेत. सोलापूर येथील 1300 मेगावॅटच्या तर मौदा येथील 1000 मेगावॅटच्या प्रकल्पातील प्रति युनिट विजेचा दर तीन रुपयांपेक्षा जास्त असल्याने दोन्ही प्रकल्प बंद आहेत.
ग्राहकांना स्वस्त दराने वीज पुरवण्यासाठी कमी दराची वीज वितरण कंपनीने प्राधान्याने खारेदी करावी आसे वीज आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार महानिर्मितीच्या तुलनेत बाजारात स्वस्त वीज मिळत आहे. त्यामुळे महानिर्मितील फटका बसत आहे. – डॉ. अशोक पेंडसे, वीजतज्ञ
जादा दरामुळे हे प्रकल्प बंद
महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक वीज प्रकल्पातून तयार होणाऱया प्रति युनिट विजेचा दर चार रुपये आहे. भुसावळचा दर चार रुपये, परळी वीज केंद्रतील विजेचा दर तीन रुपये 80 पैसे असल्याने येथील वीज निर्मिती पूर्णपणे बंद आहे. तर कोरडी प्रकल्पात आयात कोळशाचा वापर करावा लागत असल्याने त्याचाही दर जास्त ठरत असल्याने तेथील वीजनिर्मिती
बंद आहे.

































































