
धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱया कालिचरण महाराज यांची बेताल बडबड सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तर भगवान विष्णूचा अवतार असल्याचे कालिचरण यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातील संत कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कालिचरण यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले आहे.


























































