
संपूर्ण जगावर सध्या ओमायक्रोनच्या संसर्गाचे सावट आहे. पण महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून ओमायक्रोन संसर्गाची लागण झालेल्या एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. आतापर्यंत राज्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्या दहाच रुग्णांची नोंद झाली आहे.
ओमायक्रोनचा धोका निर्माण झाल्यामुळे राज्यात 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची तपासणी सुरू आहे. विमानतळावरील प्रवाशांचे 64 प्रवाशांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यापैकी 52 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान राज्यात आज कोरोनाच्या 893 नवीन रुग्णांचे निदान झाले तर दहा रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा मृत्युदर 2. 12 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 97. 72 टक्के आहे.
























































