प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता प्रतिक्षा मतदानाची

1141

महाराष्ट्र व हरयाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा शनिवारी अखेरचा दिवस होता. शनिवारी  संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता नेतेमंडळींपासून सर्व सामान्य जनता मतदानाची प्रतिक्षा करत आहेत

Campaigning for Assembly elections in Haryana and Maharashtra concludes. The states will go to polls on October 21.#MaharashtraAssemblyPolls #HaryanaAssemblyPolls

महाराष्ट्र व हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या 19 ऑक्टोबरला निवडणूकीची घोषणा झाल्यापासून या दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. गेले महिनाभर दोन्ही राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होती.

महाराष्ट्रात शिवसेना, भाजपची महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यांच्या मॅरेथॉन सभा सुरू होत्या. उमेदवारांनी मतदांरांपर्यंत पोहचण्यासांठी जंगजंग पछाडले आहेत. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर आता सर्वजण मतदान तसेच निकालाची प्रतिक्षा करत आहेत.

19 ऑक्टोबरपासून ड्राय डे

21 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या दिवसाच्या तीन दिवस आधीपासून सरकारने ड्राय डे घोषीत केला आहे. त्यामुळे 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून ते 21 ऑक्टोबरपर्यंत सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे तसेच बारमध्ये दारू विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या