
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झाल्यानंतर त्यांचा रेवदंडा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.