केंद्राची वाट न बघता राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत – अर्थमंत्री अजित पवार

1461

महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात बोलताना ‘मागील वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. केंद्राकडे मागितलेली रक्कम मंजूर न करता केंद्राकडून केवळ 956 कोटी 13 लाख रक्कम मंजूर करण्यात आली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला’, असे म्हणत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दाखवलेली तत्परता स्पष्ट केली.

दरम्यान, यावेळी बोलताना ‘देशातील आर्थिक मंदी, राज्यावर असलेला कर्जाचा बोजा, अशा अनेक गोष्टी सावरून राज्यातील जनतेला योग्य ती मदत देण्याची जबाबदारी या सरकारची आहे आणि या अर्थसंकल्पातून ते करण्याचा प्रयत्न आहे’, असे ही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तसेच ‘शेतकऱ्यांना सुलभ अशी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने जाहीर केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या बोझ्यातून मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहाता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली.’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या