24 हजार 723 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी 16 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्याच दिवशी सरकारने 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी 15 हजार कोटींची तरतूद करतानाच आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांसाठी 16 कोटी 24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे मेट्रोसाठी 476 कोटींची तरतूद करतानाच कृषीपंप व यंत्रमागधारकांनाही दिलासा देण्यात आला आहे. या वीजदरात सवलतीसाठी तब्बल 1417 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सन 2019-20 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर दोन दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च असे दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. पुरवण्या मागण्यांमध्ये सर्वाधिक 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करून ते शेतकरी कर्जमुक्तीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषिपंप व यंत्रमागांना वीजदरात देण्यात येणाऱया सवलतीसाठी 1417 कोटी, तर एसटी बसमध्ये विविध वर्गांना देण्यात येणाऱया सवलतीच्या प्रतिपूर्तीसाठी 277 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या कारसांना मदत देण्यासाठी 16 कोटी 24 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्यातील रस्ते आणि पुलांसाठी 435 तर पुणे मेट्रोसाठी 478 कोटी रुपयांची तरतूद

राज्यातील रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी 435 कोटी, तर पुणे मेट्रोसाठी 478 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. होमगार्ड व पोलीस पाटलांना देण्यात येणाऱया मानधनात वाढ केल्याने अनुक्रमे 100 व 95 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.