
दी सक्तीच्या विरोधात सर्व मराठीप्रेमी नागरिक एकवटले असून 29 जूनपासून मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात नागरी समाजातील चळवळी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा होईल, अशी माहिती मराठी अभ्यास केंदद्राचे दीपक पवार यांनी दिली.
यावेळी राज्य सरकारचा हिंदी सक्तीबाबतचा 16 एप्रिल आणि 17 जूनचा सुधारित शासन निर्णय. तसे 6 जूनचे रेखावार यांच्या सहीचे परिपत्रक ज्यामध्ये एनसीआरटीची पुस्तके महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत. या तीन पत्रकांची प्रतिकात्मक होळी केली जाईल.
7 जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन
सर्व मराठीप्रेमी 7 जुलै रोजी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती दीपक पवार यांनी दिली.