Maharashtra civic poll – मतदानासाठी हे 12 पुरावे सोबत ठेवा

15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी 12 प्रकारची ओळखपत्रे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यात रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना आदींचा समावेश आहे. 12 पैकी कोणताही पुरावा मतदानाच्या दिवशी सोबत आणून आपला हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.

प्रत्येक मतदाराला आयोगाच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले आहे. पण ते जर नसेल तर पुढीलपैकी कोणताही एक पुरावा सोबत आणणे बंधनकाराक आहे.

  • मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले पारपत्र (पासपोर्ट)
  • वाहनचालक परवाना
  • राज्य शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी दिलेले फोटो ओळखपत्र
  • बँक पोस्ट ऑफिस यांनी फोटोसह दिलेले पासबुक
  • पॅनकार्ड
  • स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
  • मनरेगा जॉबकार्ड
  • कामगार मंत्रालयाकडील योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  • छायाचित्र असलेली पेन्शनची कागदपत्रे
  • संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • सक्षम प्राधिकाऱ्याकडील फोटोसहित अपंगत्वाचा दाखला.