थंडीचा मुक्काम वाढणार; पारा 10 डिग्रीवर

486

राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून दुपारीही भरउन्हात गारवा अक्षरशः झोंबत आहे. एसी, पंखे बंद असून रात्री आणि पहाटेच्या सुमारास तर जागोजागी शेकोटय़ा पेटलेल्या दिसत आहेत. थंडीचा हा मुक्काम आणखी वाढणार असून तापमानातही 1 ते 2 डिग्री सेल्सियसने घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान चंद्रपूरमध्ये 10.1 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.

कशामुळे वाढला गारठा

उत्तर हिंदुस्थानातून वाहणाऱया थंड वाऱयामुळे गेल्या आठवडाभरात राज्यात गारठा वाढल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. येत्या 48 तासांत तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाजही वर्तवला आहे.

मुंबई 17.5, चंद्रपूर 10.1, नाशिक 10.6, नागपूर 12.0, वाशीम 12.0, अमरावती 12.2, वर्धा 12.6, बीड 13.6, यवतमाळ 14.0, सातारा 14.6, सांगली 15.7, कोल्हापूर 15.7, अलिबाग 17.5, रत्नागिरी 16.9

आपली प्रतिक्रिया द्या