राज्यात 24 तासात कोरोनाचे 8067 रुग्ण आढळले

जगभरात कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रकोप माजवत असतानाच देशातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8067 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर गेल्या 24 तासात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये कोणताही प्रवास न केलेल्यांचा समावेश आहे. आता आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 450 वर पोहचली आहे. याआधी राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. आता राज्यातही कोरोना रुग्ण आणि ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे.