
कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱया दिवशी घट झाली असून आज दिवसभरात 5 हजार 544 नवे रुग्ण आढळले आहेत तर 4 हजार 362 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी एकूण 16 लाख 80 हजार 926 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.36 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात दिवाळीनंतर करोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत असताना काल पासून या आकडय़ात घट होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज 421 रुग्ण कमी आढळले आहेत. मागील 24 तासांत कोरोनाबाधित 85 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.59 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. या बरोबरच राज्यात 5 लाख 26 हजार 555 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून एकूण 6 हजार 814 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,08,04,422 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,20,059 (16.85 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.




























































