महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

1524

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईतील धारावी, वरळीतील स्थिती नियंत्रणात आणल्याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र कोरोनाविरोधातील ही लढाई अजूनही संपलेली नाही. राज्यातील मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरिंन्सग बैठकीत घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरिंन्सगद्वारे 10 राज्यांत कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्याचा आढावा घेतला. यावेळी राज्याच्या कोरोनावरील उपायोजनांबाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी राज्यात अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला

कोरोनाशी लढण्याचा 72 तासांचा फॉम्र्युला महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्त रप्रदेश या 10 राज्यांत अॅक्टीव्ह केसेसचे प्रमाण 80 टक्के आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्याचा 72 तासांचा फॉम्र्युला दिला.

तीन आघाड्यांवर कोरोनाशी सामना

कोरोना झालेल्या व्यक्ती आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. कोरोनाची माहिती अत्यंत पारदर्शकपणे देण्यात आली आहे. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती आहे तर काहींमध्ये काहीही होत नसल्याचा बेजबाबदारपणा आहे. त्याचप्रमाणे अनेकांना पोटासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. अशा तीन आघाडयांवर कोरोनाचा सामना सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

काय आहे फॉम्र्युला?

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास पुढील 72 तासांत त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्या.

सुरुवातीचे तास महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊनच ट्रेिंसग आणि टेिंस्टग वाढवावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

10 राज्ये जिंकली तर देश जिंकेल

त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या 10 राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ही दहा राज्येच जिंकली तर देश जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचेही पंतपधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • इमिनॉलॉजी लॅब वाढविण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या विषांणुचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज आहे. जे उद्या करायचे ते आज आणि आज करायचे ते आता असे उद्याचे जग कोरोनाने आजच दाखवले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
  • कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध नाही. आज घडीला तरी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगायला हवे. अशा पद्धतीने जर कोरोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाऊन नाही तर अनलॉिंकगची प्रक्रिया आणखी सोपी आणि जलद होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.

अंतिम वर्ष परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्या!

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमत्र्यांनी यावेळी केली. विद्याथ्र्यांना सरासरी मार्क्स देऊन उत्तीर्ण करण्यात यावे. कोरानाने किती काळ असा जाणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार हा प्रश्न असून यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तसेच तोंडी परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कोरोनायुद्धात त्यांच्या इच्छेनुसार त्यांची मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या