उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र कुख्यात गुंड गजानन मारणेच्या घरी

कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी भेट दिली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात पार्थ पवार खळबळ उडाली आहे. लोकसभा भेटीने निवडणुकांच्या वर्तुळात पार्श्वभूमीवर दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता राजकीय भेटीने कलगीतुरा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मारणे टोळीची कोथरूडसह शहरात दहशत आहे. मारणेची पत्नी जयश्री मनसेच्या नगरसेविका होत्या. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यावेळी मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते. दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते.