
जगभरात थैमान घातलेल्या कोविडची प्रतिबंधक लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवून देशवासीयांचे प्राण वाचवल्याचा अजब जावईशोध आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला. मोदींची तोंड भरून स्तुती करताना फडणवीस रंगात आले आणि त्यांनी मोदी यांना चक्क कोविड लसीचा संशोधकच बनवले. त्यांच्या या वक्तव्याने सभेत बसलेले भाजपचे कार्यकर्तेही आवाक् होऊन एकमेकांकडे पाहू लागले. फडणवीसांचे हे भाषण सोशल मीडियावरून जोरात व्हायरल झाले.
केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जनसंपर्क अभियानांतर्गत कल्याण येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे लाखो जणांना जीव गमवावा लागला. कोविड प्रतिबंधक लसीमुळे मोठी जीवितहानी टळली, ही लस तयार करण्यासाठी जगभरासह हिंदुस्थानातील संशोधकांनी जीवाचे रान केले. मात्र या सभेत मोदींची तोंड भरून स्तुती करताना फडणवीस यांनी कोविडची लस मोदींनी बनवल्याचा जावईशोध लावला. मोदींनी कोविड प्रतिबंधक लस तयार करून देशाला वाचवले, असा अजब दावा फडणवीस यांनी केला.
सभेत कचरा
एकीकडे पंतप्रधान नरेंद मोदी हे देशात स्वच्छतेचा नारा देत असतानाच कल्याणच्या फडके मैदान येथील भाजपच्या जाहीर सभेत कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा केला होता. पाण्याच्या बाटल्या आणि नाष्ट्याची पाकिटे सर्वत्र फेकली होती. त्यामुळे सायंकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आणि खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कपिल पाटील- किसन कथोरे वाद चव्हाट्यावर
सभेला भिवंडी लोकसभेतील मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी दांडी मारली. भिवंडीचे खासदार, केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि किसन कथोरे यांचा अंतर्गत वाद यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. कपिल पाटील हे अनेकदा जाहीर कार्यक्रमात आमदार कथोरे यांच्या विरोधात गरळ ओकतात. त्यामुळे पाटील यांच्या कार्यक्रमाला कथोरे दांडी मारतात तर कथोरे यांच्या कार्यक्रमात पाटील दांडी भाजपचेच कार्यकर्ते करत होते.
20 मिनिटांच्या भाषणात 17 मिनिटे उद्धव ठाकरेंवरच
रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर पार पडले होते. या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा बुरखाच फाडला होता. फडणवीस यांच्यावरही त्यांचा चाबूक मारतात. त्यांच्या या वादामुळे कडाडला होता. या टीकेने सैरभैर झालेल्या फडणवीस यांनी आज पक्षाच्या जनसंपर्क अभियान सभेत भिवंडी लोकसभा आणि मुरबाड कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका करण्यात आपला वेळ खर्ची घातला. विधानसभा मतदारसंघात उणेपुरे 20 मिनिटांचे त्यांचे भाषण झाले. त्यातील 17 मिनिटे ते उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलले. तर उरलेली तीन मिनिटे मोदींना कोविड लसीचा निर्माता बनवण्यात घातली. वर्षभरातील कारभाराचा लेखाजोखा मांडण्यास असल्याची कुजबूज सभास्थळी ते विसरल्याने लोकांसमोर भाषणातील कोणते मुद्दे घेऊन जायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला.































































