राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, पंकज भुजबळ येथून लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

#MahaElection 2019 राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. या यादीमध्ये 20 जागांसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले असून ते नाशिक मधील नांदगाव मतदार संघातून लढणार आहे

अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी

जळगाव शहर – अभिषेक पाटील
बाळापूर – संग्राम गुलाबराव गांवडे
वाशिम – कारंजा – प्रकाश डहाके
अमरावती – मेळघाट – केवळाराम काळे
गडचिरोली – अहेरी – धर्मरावबाबा आश्रम
यवतमाळ – दिग्रस – मो. तारीक मो. शमी
परभणी – गंगाखेड – मधूसुदन केंद्रे
संभाजीनगर – कन्नड – संतोष कोल्हे
नाशिक – नांदगाव – पंकज भुजबळ
नाशिक – बागलाण – दिपीका चव्हाण
नाशिक – देवळाली – श्रीमती सरोज अहिरे
रायगड – कर्जत – सुरेश लाड
पुणे – खेड आळंदी – दिलीप मोहीते
पुणे – मावळ – सुनिल शेळके
पुणे – पिंपरी – श्रीमती सुलक्षणा शिलावंत
बीड – आष्टी – बाळासाहेब आजबे
सोलापूर – माढा – बबनदादा शिंदे
सोलापूर – मोहोळ – यशवंत माने
सोलापूर – माळशिरस – उत्तमराव जानकर
कोल्हापूर – चंदगड – राजेश नरसिंग पाटील