पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसला. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर काहींना जबर फटका बसला. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सध्या राज्यभरातून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून जीवनावश्यक वस्तू असो किंवा इतर स्वरूपात मदत केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मदतीचा ओघ अद्याप सुरू आहे.

पूरग्रस्तांना अशीही मदत

राज्यात कोकण, कोल्हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता गोदरेज अप्लायन्सेसची ‘गोदरेज अँण्ड बॉयस’ पुढे सरसावली आहे. या पुरात खराब झालेल्या उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी गोदरेज अॅण्ड बॉयसतर्फे विशेष सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा व मदत देण्याचा कंपनीचा हेतू आहे. चिपळूण, कोल्हापूर व सांगली या जिह्यांमध्ये आठवडाभर चालणाऱया या सेवा उपक्रमाला सुरुवात झाली असून 8 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 209 5511 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई काँग्रेसतर्फे कोकणवासीय पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक मदत सामग्री पाठविण्यात आली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते मदत घेऊन जाणाऱया वाहनांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, भूषण पाटील, अतुल बर्वे, संदेश काsंडविलकर आदी उपस्थित होते.

चिपळूण येथील चोरणे व कोपरे गावात झालेल्या पूरग्रस्तांसाठी भारतीय कामगार सेनेच्या अंधेरी येथील कोर्टयार्ड हॉटेल युनिटकडून खासदार-भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर, युनिटचे अध्यक्ष रूपेश कदम आणि युनिट कमिटी यांच्या वतीने जीवनावश्यक साहित्याची मदत पाठवण्यात आली.

शिवसेना शाखा क्रमांक 5 व नगरसेवक संजय घाडी यांच्या प्रयत्नांनी कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य रवाना करण्यात आले, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला विभागातील अनेक देणगीदारांनी एक लाख रुपयांचे धनादेश दिले. यावेळी विभागप्रमुख विलास पोतनीस, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, महिला विधानसभा संघटक मनीषा सावंत, शाखाप्रमुख सचिन शिर्पे, महिला शाखा संघटक विद्या पोतदार, संदीप शेलार, दिलीप परब, नितीन वंजारा, संतोष चौधरी, प्रमोद बलकवडे, आर.के.कदम, रामकृष्ण नायक, नीलेश राणे, प्रतिभा अफंडकर, नितेश माने, किशोर परदेशी, प्रमोद दिवाडकर, उषा लाड, संजना सावंत, सुवर्णा कोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इंडियन ऑईल कर्मचारी व स्वयंसेवकांनी नुकतेच चिपळूण आणि राजापूर तालुक्यांतील 700 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याशिवाय टीम इंडियन ऑईलने बुडालेल्या वाहनांची साफसफाई व दुरुस्ती करून ग्रामस्थांना मदतदेखील केली.

मदतीचे सेवाकार्य अखंड सुरूच, शिवसेनेकडून तब्बल नऊ कंटेनर भरून मदत रवाना

विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड विधानसभा क्षेत्रामधून मदतकार्य

कोकणात रायगड, रत्नागिरीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेने हाती घेतलेले मदतीचे सेवाकार्य अखंड सुरूच आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड येथील शिवसेनेच्या सर्व शाखांमधून नऊ कंटेनर भरून जीवनावश्यक वस्तू कोकणातील गावांमध्ये नुकत्याच रवाना करण्यात आल्या आहेत. यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंचा समावेश आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांना जेवढी शक्य होईल, जशी शक्य होईल, ती मदत करा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड येथील सर्व शाखांच्या माध्यमातून धान्य, कपडे, पाण्याच्या बाटल्या, कपडे, चादरी, टॉवेल्स, ब्लँकेटस्, साबण, फ्लोअर क्लीनर, सॅनिटरी नॅपकिन, चटई, सतरंज्या, मेणबत्ती, बिस्किट, फिनाईल, टूथपेस्ट, झाडू, भांडी असे जीवनावश्यक साहित्य महाड, चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून रवाना करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, नगरसेवक उपेंद्र सावंत, राजराजेश्वरी रेडकर, उमेश माने, दीपमाला बढे, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, अनंत पाताडे, माजी उपविभागप्रमुख विश्वास शिंदे, विधानसभा संघटक संदीप सावंत, परम यादव, उपविभाग संघटक रश्मी पहूडकर, स्नेहल मांडे, पल्लवी संजय पाटील, राजोळ पाटील, मामा मंचेकर, प्रशांत दास, सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.