
मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादनिमित्त काढला जाणारा जुलूस 6 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने ईदची शासकीय सुट्टी 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 सप्टेंबरला मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये सुरू राहतील.
6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून गणपती विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर ईदचा जुलूस पुढे ढकलण्यावर मुस्लिम संघटनांच्या बैठकीत एकमत झाले होते. काँग्रेस नेते नसीम खान, अमिन पटेल, सपाचे रईस शेख यांनीही शासकीय सुट्टी 8 सप्टेंबरला द्यावी अशी विनंती सरकारला पत्राद्वारे केली होती. मुंबईव्यतिरिक्त इतर जिह्यांमध्ये ईदची सुट्टी 5 सप्टेंबरलाच असेल.