ट्विटर दाखवणार कसा आहे नेता

ट्विटर तसेच फेसबुकवरही निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगत आहे. विविध पक्ष आपल्या उमेदवाराचा लेखाजोखा सोशल मीडियावरून मांडत आहेत. आता हाच सोशल मीडिया आपला नेता कसा आहे हे दाखवणार आहे.

नेत्यांची भाषणे उपलब्ध करून देण्यासाठी ट्विटरने #ChaupalOnTwitter हा उपक्रम मतदारांसाठी आणला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता नेत्यांसोबत चौपाल सेशन म्हणजेच पारावरील गप्पांचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात पुढारी आणि नागरिकांचा थेट सहभाग असेल. हे निवडणूक इमोजी #MaharashtraAssemblyPolls वर उपलब्ध असतील. 30 ऑक्टोबरपर्यंत हे इमोजी वापरता येतील.

आपली प्रतिक्रिया द्या