@45 अंश! नांदेड शहराने गाठला तापमानाचा उच्चांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड शहराने तापमानाचा मराठवाड्यातील सर्वाधिक उच्चांक आज गाठला. नांदेडचे तापमान 45 अंश डिग्री सेल्सियस एवढे नोंदले गेले आहे, तर किमान तापमान 28 अंश डिग्री सेल्सियस एवढे आहे.

मराठवाड्यातील तापमानाचा पारा वरचेवर वाढत असून, आज नांदेडने तर कहरच केला. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. सोमवारी नांदेडचे तापमान 45 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, या वर्षातील सर्वाधिक तापमान आज नांदेडला नोंदले गेले.

मराठवाड्यातील सर्व शहराच्या तुलनेत नांदेडचे तापमान सर्वाधिक आहे. उष्णतेची जबरदस्त लाट सध्या संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून, या तापमानाने कहरच केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच नागरिक घरी बसून असून, अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. विद्युत उपकरणांची दुकाने बंद असल्याने अनेक घरांमध्ये अद्यापही कुलर सुरू झाले नाहीत. वातानुकुलित सेवाही कोरोना विषाणू संसर्गासाठी धोकादायक असल्याने अनेकांनी आपले एसी बंद ठेवले आहेत. नांदेडचे किमान तापमान आज 28 अंश डिग्री सेल्सियस एवढे नोंदले गेले.