‘खेलो इंडिया’चे यजमानपद महाराष्ट्राला,पुण्यात 9 ते 20 जानेवारीदरम्यान रंगणार क्रीडा महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

युवा खेळाडूंसाठी पर्वणी ठरणाऱया ‘खेलो इंडिया’च्या दुसऱया पर्वाचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले असून पुढल्या वर्षी 9 ते 20 जानेवारी या कालावधीत हा क्रीडा महोत्सव पुण्यातील शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे रंगणार आहे. यामध्ये 29 राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांतील 6200 ऍथलीटस्चा कस लागणार आहे. 17 व 21 वर्षांखालील गटांत 18 खेळांच्या 406 क्रीडा शर्यतींचा थरार यावेळी तमाम क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे याप्रसंगी म्हणाले, महाराष्ट्राला मिळालेल्या यजमानपदाचे सोने करूया. सर्व खेळाडूंचे स्वागत करूया. देशातील सर्व युवा खेळाडू ‘खेलो इंडिया’मध्ये 406 सुवर्ण, 406 रौप्य व 510 कास्य पदकांसाठी सर्वस्व पणाला लावतील.