
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होतील, असे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवले. पुण्यातील मेळाव्यात ते बोलत होते. काही निवडणुका 2022 साली होणे अपेक्षित होते. मात्र 2022 गेले, 2023, 2024 हे वर्षही गेले. आता 2025 ही संपायला आलेय. निवडणुका लांबण्यामागे काय कारणे आहेत याच्या खोलात मी जात नाही, असे ते म्हणाले.