मुंबईत क्रिकेट पर्यटनाला सुरुवात, एमटीडीसी-एमसीएमध्ये करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आता मुंबईत क्रिकेट या खेळाच्या पर्यटनाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे वानखेडे आता पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमटीडीसी) व मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्यामध्ये शुक्रवारी याबाबत करार करण्यात आला.

आदित्य ठाकरे याप्रसंगी म्हणाले, हे स्टेडियम क्रिकेटप्रेमींसाठी नुसते ठिकाण नसून क्रिकेटच्या भक्तांचे स्थळ आहे. आता आम्ही वानखेडे स्टेडियमची तीर्थयात्रा संस्मरणीय बनवणार आहोत. यावेळी एमटीडीसी व एमसीए यांच्या करारानुसार एमएमआर क्षेत्रामध्ये क्रिकेट पर्यटनाचा विकास करण्यात येणार आहे.