
राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत (एनएसएस) उल्लेखनीय कार्यासाठी मुंबई विद्यापीठाचे के.सी. महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘वर्ष 2017-18 च्या एनएसएस’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये एकूण 10 महाविद्यालयांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातून मुंबईतील केसी महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्राचार्या हेमलता बागला यांना चषक आणि 1 लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना 70 हजार रुपये, रौप्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 29 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र्ा विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला
असून त्याला 50 हजार रुपये, रौप्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.




























































