निर्यातीत महाराष्ट्र पिछाडीवर तर गुजरात आघाडीवर, निती आयोगाची ‘निर्यात सज्जता निर्देशांक’ यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात गुंतलेले केंद्रातील मोदी सरकार आणि असंविधानिक मार्गाने सत्तेत आलेले मिंधे सरकार यामुळे प्रगतिशील महाराष्ट्र राज्याची आता पीछेहाट होत आहे. नुकताच निती आयोगाने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालानुसार निर्यातीत महाराष्ट्र राज्य पिछाडीवर पडले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुढे गुजरात आणि तामीळनाडू राज्य गेले आहे. निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक’ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याने ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? अजून किती मागे घेऊन जाणार आहात!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विदेशी गुंतवणुकीपासून ते उद्योग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर असायचे. निर्यातीतसुद्धा महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक होता; परंतु केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात मिंधे सरकार असल्याने परिस्थिती बदलली आहे. निती आयोगाने ‘निर्यात सज्जता निर्देशांक’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या यादीत तामीळनाडू हे राज्य अव्वल क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र राज्य दुसऱया नंबरवर आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात देशातून सर्वाधिक निर्यात ही गुजरात राज्यातून झाली आहे. यातही महाराष्ट्र पिछाडीवर म्हणजे दुसऱया क्रमांकावर आहे.

निती आयोगाच्या अहवालानुसार 2021 ते 2022 या वर्षात देशातून झालेल्या एकूण निर्यातीपैकी 30 टक्के वाटा एकटय़ा गुजरातमधील आहे, तर महाराष्ट्राचा केवळ 17.33 टक्के आहे. 2019 ते 2020 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य हे निर्यातीत पहिल्या क्रमांकावर होते. तेव्हा राज्याचा वाटा 20.71 टक्के होता, तर गुजरात राज्याचा वाटा फक्त 20.25 टक्के इतका होता. 2021-21 या वर्षात गुजरातमधून 20.76 टक्के तर महाराष्ट्रातून 20.01 टक्के निर्यात झाली होती.