
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी 2 जूनला दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
यंदा दहावीच्या परिक्षेला 8 लाख 44 हजार 116 मुलगे तर 7 लाख 33 हजार 67 मुली असे एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. ही परिक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान पार पडलेली.
या लिंकवर निकाल पाहता येऊ शकतो –
1. mahresult.nic.in
2. https://ssc.mahresults.org.in
3. http://sscresult.mkcl.org






























































