राज्य बँक देणार 72 नागरी बँकांना क्लिअरिंगची सेवा

खासगी क्षेत्रातील येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध आणल्याने त्यांच्याकडून क्लिअरिंगबरोबरच इतर सेवा घेणाऱया नागरी सहकारी बँकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सदर नागरी सहकारी बँका आणि जिल्हा बँकांना कोणत्याही अटीशिवाय आपली क्लिअरिंग सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या सात-आठ दिवसांपासून संबंधित बँकांची होणारी गैरसोय थांबणार आहे. राज्यातील 72 नागरी सहकारी बँका येस बँकेच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या क्लिअरिंग, आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय, आयएमपीएस सेवा ग्राहकांना देतात. येस बँकेवर निर्बंध आल्याने या सेवांचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याची दखल घेत राज्य बँक कोणताही मोबदला न घेता आपली सेवा देणार असल्याचे राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या