
महाराष्ट्रात या वर्षी तब्बल 132 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून हे आतापर्यंतचे विक्रमी उत्पादन आहे.राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात या वर्षी आतापर्यंत 1187 लाख टन उस कारखान्यांमधून वापरला गेला असून अद्याप 90 लाख टन उस हा शेतात आहे.”महाराष्ट्रात 2019-20 या वर्षात सर्वात जास्त 107 टन साखरेचे उत्पादन झाले होते. या वर्षी 132 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन आहे. महाराष्ट्रा खालोखाल उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले”, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
यावर्षी विक्रमी साखर कारखान्यांशी संबंधित कंपनीने तब्बल 130 ते 140 कोटी इथेनॉलची निर्मिती करून 9000 ls 10000 कोटी कमावले आहेत. साधारणत: महाराष्ट्रात उस गाळपाचा हंगाम हा 120 ते 140 दिवस चालतो मात्र यंदा उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे हा हंगाम 160 दिवसापर्यंत चालू शकतो.



























































