
आज मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघाला. यावेळी मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंतभाई पाटील, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनिल प्रभू, आमदार सचिन अहीर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर, अनिल देशमुख, सुनिल लंके, भाई जगताप, कृष्णा रेड्डी आणि लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला.
फोटो – रुपेश जाधव











































































