महावितरणच्या औद्योगिक वीज दरात होणार वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांवर सुमारे २२ टक्के दरवाढ लादणारा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. यामुळे औद्योगिक ग्राहकांना मोठा फटका बसणार असून शेजारील राज्याच्या तुलनेत विजेचे दर दीडपट होणार असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. याविरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यासाठी २५ जुलै राजी मुंबईत वीज ग्राहकांची राज्यस्तरीय परिषद होणार आहे.

महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावामुळे वीज ग्राहकांवर सरासरी १ रुपया ४५ पैसे प्रति युनिट एवढा भार पडणार आहे. औद्योगिक ग्राहकांच्या वीजेचे दर सध्या शेजारील राज्याच्या तुलनेत २५-३५ टक्के जादा आहेत, तर आता दाखल केलेल्या प्रस्तावामुळे विजेचे दर दीडपट होतील.

वीज मीटरची माहिती आता ऑनलाइन कळणार

वीज मीटर नसल्याचे कारण देत ग्राहकांना कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱया अधिकाऱयांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे. ग्राहकांना पुरवले जाणारे वीज मीटर कोणत्या कार्यालयात किती आहेत याची इत्थंभूत माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. महावितरणने कंपनीच्या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व मीटरची आकडेवारी www.mahadiscom.com या संकेस्थळावर टाकली आहे.