
घरगुती वीजमीटर मंजुरीसाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले. सुनील आबासाहेब चव्हाण (वय 54, रा. विश्रामबाग, जि. सांगली) असे अटक केलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार कंत्राटदारांच्या एका ग्राहकाला घरगुती वीजजोडणी मंजुरीसाठी सहायक अभियंता सुरेश चव्हाण यांनी सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारींनंतर पडताळणी करून, आज सहा हजारांची लाच स्वीकारताना त्याला कोल्हापूर लाचलुचपतच्या पथकाने पकडले.
लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पोरे, विकास माने, कृष्णात पाटील, मयूर देसाई, रूपेश माने, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.
आपली प्रतिक्रिया द्या