वीजेचे मीटर स्लो करण्यासाठी लाच मागणारा कंत्राटी कामगाराला रंगेहात अटक

490

घरामध्ये असलेले लाईटचे मीटर स्लो करुन देणारा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा कंत्राटी मीटरचालक सोमनाथ वाघुले याला चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. नगरमधील तक्रारदार महिलेच्या घराचे लाईटबिल नेहमीपेक्षा जास्त आले होते. विद्युत महामंडळाने बसवलेले विद्युत मीटरमध्ये फेरफार करुन मीटर स्लो करुन पुढील महिन्यापासून कमी बिल येण्यासाठी आरोपी सोमनाथ वाघुले याने महिलेकडे 4 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. संबंधीत महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानंतर शुक्रवारी आरोपीला 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना बालिकाश्रम रोड येथे रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक हरीष खेडकर यांच्या अधिपत्याखाली पथकाने कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या