पुरामुळे ‘महावितरण’चे 523 कोटींचे नुकसान

283

पूरस्थितीमुळे ट्रान्स्फॉर्मर पाण्यात गेल्यामुळे तसेच पोल पडल्यामुळे ‘महावितरण’चे 523 कोटींचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर-सांगलीतील 4 हजार महावितरणचे, दीड हजार कंत्राटी व शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या 40 पथकांतील 500 हून अधिक कर्मचार्‍यांच्या टीम अहोरात्र झटत आहेत. कोल्हापूर जिह्यातील 24 व सांगली जिल्ह्यातील 10 अशी 34 उपकेंद्रे 13 ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात आली आहेत तर उर्वरित भागातील वीजपुरकठा 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाईल अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाकनकुळे यांनी आज दिली.

नियंत्रण कक्ष

या महापुराचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘महावितरण’च्या मुख्यालयात विशेष दैनंदिन सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीकर कोल्हापूर व सांगली 24 x 7 नियंत्रण कक्ष करिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. याकरिता 40 पथके तयार करण्यात आली. या एका पथकामध्ये एका वाहनासह 1 अभियंता, 3 तांत्रिक कर्मचारी  क कंत्राटदारांचे 8 कामगार यांचा समावेश होता.