
देशातील सर्वात मोठय़ा अगरबत्ती आणि धूप उत्पादकांपैकी एक असलेल्या ‘झेड ब्लॅक’च्या ‘प्रार्थना होगी स्वीकार’ या नवीन पॅम्पेनमध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झळकला आहे. फराह खान दिग्दर्शित या जाहिरातीचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून धोनी टीम इंडियाच्या रेट्रो जर्सीमध्ये दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली. ही जाहिरात 15 ऑगस्ट रोजी लाँच झाल्याने चाहत्यांमध्ये धोनीच्या क्रिकेट प्रवासातील आठवणींना अधिक उजाळा मिळाला. कारण गेल्या वर्षी याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.




























































