जिलेबी-फाफडावर तुटून पडला बेन स्टोक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल सुरु झाली आहे. देशभरातील कोट्यवधी चाहते या दिवसाची वाट पाहत होते.  यामध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरु आहे. अशातच सामना सुरु होण्यापूर्वी सीएसकेचा खेळाडू बेन स्टोक्स एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला आहे.

जिलेबी-फाफडावर तुटून पडला बेन स्टोक्स
पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या खेळाडू जिलेबी-फाफडावर तुटुन पडलेले दिसले. यावेळी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत सगळे खेळाडू खाण्यावर तुटून पडले. यावेळी बेन स्टोक्सच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. धोनीने देखील याचा आनंद घेतला. अनेकदा धोनीही त्याचं संपूर्ण फिटनेस विसरून स्ट्रिट फूडवर ताव मारताना दिसतो.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने चारवेळा विजेतेपद पटकावलंय. यावेळी संपूर्ण टीम मैदानावर मेहनत घेतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीचं हे शेवटचं वर्ष असणार आहे. त्यामुळे यावर्षी सीएसके हे विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.

दोन्ही टीम्सचा इतिहास
तापर्यंत गुजरात आणि चेन्नईचे संघ केवळ 2 वेळा आमने-सामने आलेत. चेन्नई आणि गुजरातदरम्यान झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातनेच विजय मिळवला आहे. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये गुजरातने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये 7 विकेट्सने जिंकला होता.