माहीम विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहीम विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

  ज्यात उपविभाग युवा अधिकारी – गणेश पाबले (शाखा क्र. – 182), उपविभाग युवा अधिकारी – मंदार म्हात्रे (शाखा क्र. 190, 191), उपविभाग युवा अधिकारी – विराज सावंत (शाखा क्र. 192, 194), उपविभाग युवा अधिकारी – अजित पुरतडकर (शाखा क्र. 193), विधानसभा समन्वयक – विराज ठाकूर, विधानसभा समन्वयक- सिद्धेश चव्हाण, विधानसभा समन्वयक -साईश अनिल माने, विधानसभा चिटणीस ओमकार कोरे, विधानसभा चिटणीस – चेतन राणे, विधानसभा चिटणीस – मिहीर खोपकर,  उप-विधानसभा समन्वयक – अजय भोसले, उप-विधानसभा समन्वयक अक्षय परब, उप-विधानसभा समन्वयक- मंगेश पेडणेकर, उप-विधानसभा समन्वयक – अमोल मोरे, उपविधानसभा चिटणीस –  दीपक गायकवाड,  उपविधानसभा चिटणीस – नीलेश दहिभाते, उपविधानसभा चिटणीस – अभिषेक पाताडे, उपविधानसभा चिटणीस विजय गुरव यांची निवड करण्यात आली आहे.

 तर शाखा युवा अधिकारी – रत्नेश वैती (शाखा क्र. 182), शाखा युवा अधिकारी – दिनार पाटील (शाखा क्र. 190), शाखा युवा अधिकारी – आकाश सर्वदे (शाखा क्र. 191), शाखा युवा अधिकारी – चिंतामणी मोरे (शाखा. क्र. 193), शाखा युवा अधिकारी – अभिषेक केसरकर (शाखा क्र. 194) यांची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय शाखा समन्वयकपदी – साई आंब्रे (शाखा क्र. 190), शाखा समन्वयक – जय पांचाळ (शाखा क्र. 191), शाखा समन्वयक – प्रथमेश सुर्वे (शाखा क्र. 193), शाखा समन्वयक – विक्रांत कातवणकर (शाखा क्र. 194 ) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.