महिंद्रा कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ; कामगारांनी मानले शिवसेनेचे आभार

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे इगतपुरी येथील महिंद्रा पंपनीतील कामगारांच्या पगारात 17,500 रुपयांची घशघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने वेतनवाढीचा करार झाला. यासाठी संयुक्त सरचिटणीस प्रकाश नाईक यांनी युनिटचे स्थानिक पदाधिकारी भगवान हडोळे, अर्जुन भोसले आणि अन्य सहकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.

करारावेळी महिंद्राचे ज्येष्ठ उपाध्यक्ष विनय खानोलकर, एचआर हेड संग्राम देशमुख, युनिटचे प्रमुख राजेश खानोलकर, महाव्यवस्थापक उमाशंकर यादव, संदीप गिजरे आणि सहकारी तसेच भारतीय कामगार सेनेच्या वतीने संयुक्त सरचिटणीस प्रकाश नाईक, दिलीप जाधव, युनिटचे अध्यक्ष भगवान हडोळे, अर्जुन भोसले, अंकुश बकाल, संदीप विश्वकर्मा, रमेश अहिरे आणि अन्य पदाधिकारी तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव उपस्थित होते.