मैसनामने कोरिया ओपन जिंकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरच्या मैसनाम मेईरबा लुवांग या युवकाने कोरिया ज्युनियर ओपन (19 वर्षांखालील) स्पर्धेत एकेरी गटात जेतेपदावर मोहोर उमटवली. त्याने अंतिम फेरीच्या लढतीत कोरियाच्या ली हॅक जू याचा 21-10, 21-13 अशा फरकाने पराभव करीत झळाळता करंडक पटकावला. दरम्यान, सतीशकुमार करुणाकरण याला कास्यपदकावरच समाधान मानावे लागले.