माजलगावात मोहन जगतापांचे बंड झाले थंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

#MahaElection माजलगाव मतदार संघात शब्द देऊनही भाजपा ने उमेदवारी दिली नाही, आपल्यावर अन्याय केला असा आरोप करत बंडखोरी पुकारलेले मोहन जगताप अपक्ष म्हणून मैदानात उतरणार होते. मात्र आमदार सुरेश धस यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने माजलगवात जगतापांचे बंड अखेर झाले थंड झाले आहे.

माजलगाव मतदार संघातून मोहनराव जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली जाईल असा शब्द दिल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा मध्ये प्रवेश केला, भाजपा ची उमेदवारी आपल्यालाच या आत्मविश्वासाने जगताप यांनी मतदार संघ पिंजून काढला मात्र ऐनवेळी भाजपाने जगतापाऐवजी रमेश अडसकर यांना उमेदवारी दिल्याने मोहन जगताप समर्थक चांगलेच संतापले होते , आता माघार नाही म्हणत मोहन जगताप यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत बंडाचे निशाण फडकावले होते मात्र आमदार सुरेश धस माजलगाव मध्ये दाखल झाले त्यांनी जगताप यांची भेट घेत श्रेष्ठीचा निरोप पोहोच करत मनधरणी केली, पाच तास झालेल्या बैठकीनंतर धस यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले, परळीत पंकजा मुंडे यांची भेट घडवून दिली चर्चा झाली अन जगतापाचे बंड थंड झाले, या मुळे आता प्रकाश सोळुंके विरुद्ध रमेश आडसकर अशी सरळ आणि मोठी लढत माजलगाव मध्ये पाहण्यास मिळणार आहे.केज आरक्षित मतदार संघ असल्यामुळे रमेश आडसकर यांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून त्यांना भाजपाने माजलगाव मधून निवडणुकीत उतरविले आहे, मोठी लढत माजलगाव रंगणार आहे हे नक्की.