Video – अहमदाबादमध्ये कपड्यांच्या गोडाऊनला आग, आठ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील अहमदाबाच्या एका कपड्याच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागली. या आगी नतंर एक इमारतीत एक स्फोट झाला आणि त्यामुळे छत खाली कोसळले. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल्याच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे युद्ध स्तरावर काम सुरू आहे.

छत कोसळल्यानंतर ढिगार्‍याखाली 5 जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोडाऊनच्या बाजूला एका बॉयलरमध्ये स्फोट झाला आणि आग लागली. या घटनेत आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती स्थिर असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

आतापर्यंत 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आज विझवण्याचे काम सुरू आहे.