दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात आग, 34 बंबांनी आणली आटोक्यात

267

दिल्लीतील प्रख्यातएम्सरुग्णालयात काल सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी 34 बंबांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही.

एम्सरुग्णालयाच्या इमारतीला इमर्जन्सी वॉर्डनजीक आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथम आग भडकली, मात्र आगीच्या धुराचे लोट दुसर्‍या मजल्यापर्यंत पोहचले होते. या इमारतीत डॉक्टरांच्या निवासाच्या खोल्या आणि संशोधन प्रयोगशाळा आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी इमारतीमधील लोकांना सुरळीतरीत्या बाहेर काढले. सायंकाळी पाचच्या सुमारासएम्सरुग्णालयाच्या पीसी ऍण्ड टिंचिंग ब्लॉकला आग लागल्याची खबर आली असे अग्निशमन अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, एम्स रुग्णालयातील इमारतीची आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन कर्मचार्‍यांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. लोकांनी शांतता पाळावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या