
सामना ऑनलाईन । मुंबई
माझगाव डॉकमध्ये एका युद्धनौकेला भीषण आग लागली आहे. या आगीत एका कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे.
माझगाव डॉकमधील एका युद्धनौकेला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत कंत्राटी तत्वावर काम करणार्या ब्रिजेंद्र कुमार या 24 वर्षीय कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी किरकोळ जखमी झाला आहे. ब्रिजेंद्र कुमार हा कर्मचारी 100 ट्क्के भाजला होता अशी माहिती जेजे रुग्णालयाचे सुपरिटेंडेट डॉ संजय सुरासे यांनी दिली. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी समितीही नेमली आहे.


























































