मला पुन्हा कॉन्स्टेबल करा! दिल्लीतील पोलीस उपनिरीक्षकाने मागितले डिमोशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करावल पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक मनीष यांनी स्वेच्छेने पदावनतीची विनंती केली होती आणि आता डीसीपींनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना पुन्हा कॉन्स्टेबल बनवण्यात आले आहे.

मनीष यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना एक निवेदन देत म्हटले की, मला उपनिरीक्षक पदावर काम करण्यास रस नाही. मला पुन्हा कॉन्स्टेबल बनवावे. मनीष यांच्या मागणीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर उपायुक्त यांनी मनीष यांचा अर्ज स्वीकारत त्यांना कॉन्स्टेबल बनवले.

वाढत्या जबाबदाऱया आणि व्यस्तता नको

मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक कॉन्स्टेबल म्हणूनच केली होती. त्यानंतर विभागीय परीक्षा देत ते उपनिरीक्षकपदापर्यंत पोहचले. ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यामुळे पुन्हा कॉन्स्टेबल बनून ते अभ्यासासाठी जास्त वेळ देऊ इच्छितात, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.