घराचा मेकओव्हर

148

घराचा मेकओव्हर

आपले घर सजवावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सणासुदीसाठी घर सजवायचं तर आपली जागा आणि त्यासाठी लागणारा पैसा याचा विचार करावाच लागतो. पण काहीजणांना घराचा कोपरा न् कोपरा हटके असावा असं वाटतं. आजच्या घडीला डिझायनर सिलिंग्सचा पर्याय पाहाता आपल्या छताचीही सजावट करता येते, असे सेंट गोबेन इंडियाचे उपाध्यक्ष सुदीप कोलते यांनी सांगितले.

डिजायनर सिलिंगची संकल्पना आता आपल्या देशातही रुजू लागली आहे. त्यातूनच बिल्डर आणि आर्किटेक्ट ब्लॉक सजवण्यासाठी डिझायनर सिलिंग्जचा उपयोग करत आहेत. तेव्हा यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या दिवाणखान्यातील कंटाळवाणी छते बदलून डिझाइन सिलिंग्ज बसवायला काय हरकत आहे?

आपली प्रतिक्रिया द्या